अजिंठा चौफुली येथे आढळलेल्या प्रौढाचा मृत्यू

0

जळगाव : शहरातील अजिंठा चौफुलीजवळ सुमारे ४५ वर्षीय अनोळखी प्रौढ बेशुद्धावस्थेत आढळून आल्याची घटना सोमवारी घडली. त्या प्रौढावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील अजिंठा चौफुली येथे दुकानाजवळ अनोळखी अंदाजे ४५ वर्षे प्रौढ व्यक्ती हा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. परिसरातील नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी व पोलीस कॉन्स्टेबल अतुल पाटील यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेल्या प्रौढाला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. सायंकाळी ६ वाजता त्याच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दरम्यान मयताची ओळख पटलेली नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  मयताची ओळख पटवण्याचे  आवाहन पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.