जळगाव : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने वाहतुकीचे नियोजन केले आहे. पोलिस प्रशासनाच्यावतीने या मार्गाची पाहणी करण्यात आली आहे. दि. २८ सप्टेंबर रोजी विसर्जन मार्गावरुन सर्वच वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. अनेक वाहतूक मार्गांमध्ये तात्पुरता बदल करण्यात आला.
गणरायाची विसर्जन मिरवणूकीला पहाटे सहावाजेपासून सुरुवात होणार असून ती मिरवणुक रात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. मिरवणूक ला. ना. चौक, कोर्ट चौक, गोविंदा रिक्षास्टॉप, नेहरू चौक, महानगरपालिका इमारत पाचोराकडे जाणाऱ्या मार्गावरील बदल समोरील चौक, जयप्रकाश नारायण चौक, शास्त्री टॉवर चौक, सानेगुरुजी चौक, घाणेकर चौक, भिलपुरा चौक, बालाजी मंदिर, रथ चौक, सराफ बाजार, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, बेंडाळे चौक मार्गाने जाणार आहे. त्यासाठी मिरवणुकीस अडथळा होवू नये म्हणून विसर्जन मिरवणूक मार्ग, या मार्गास मिळणारे सर्व उपरस्ते व गल्ल्यांमधून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक सेवा वगळून) विसर्जन दिवशी वरील वेळेदरम्यान प्रवेश बंद करण्यात आला आहे.
यावल – चोपडा मार्गावरील बदल
चोपडा, यावल, विदगाव, शिवाजीनगरकडून मिरवणूक मार्गाकडे येणारी वाहने दि. २८ सप्टेंबर सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत शिवाजीनगर, दूध फेडरेशन, जुनी जैन फॅक्टरी, गुजराल पेट्रोल पंपमार्गे तर आसोदा-भादलीकडून येणाऱ्या व जाणाऱ्या एसटी बसेस व इतर सर्व वाहने शिवाजीनगर, दूध फेडरेशन, जुनी जैन फॅक्टरी, गुजराल पेट्रोल पंप, महामार्गावरून आकाशवाणी चौक, नवीन बसस्थानकावर जातील व येतील.
पाचोराकडे जाणाऱ्या सर्व वाहनांकरीता (अवजड वाहने वगळून) आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, डिमार्ट, मोहाडी रोड वाय पॉइंट, गुरु पेट्रोलपंप, मलंगशहा बाबा दर्गामार्गे पाचोराकडे जातील. तसेच पाचोराकडून जळगावकडे येणाऱ्या कार, दुचाकी व इतर हलक्या वाहनाकरीता मलंगशहा बाबा दर्गा, गुरु पेट्रोल, राजे संभाजी चौक, संत गाडगेबाबा चौक, महाबळ चौक आकाशवाणी चौकमार्गे जळगावकडे येतील. याशिवाय पाचोराकडून येणारी वाहने ही आवश्यकतेनुसार पाचोरा, वावडदाकडून नेरीमार्गे अजिंठा चौकातून येतील.