धक्कादायक; जळगावात पुन्हा गोळीबार, वाचा सविस्तर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरात दिवसेंदिवस हाणामारी, खुनाच्या घटना घडत असून गॅंगवॉर उफाळून येत आहे. रविवारी रात्री शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाला मारहाण करीत दुचाकीची तोडफ़ोड करण्यात आली. सलग दुसऱ्या दिवशी शिवाजीनगर हुडको परिसरात दुपारी एक वाजेच्या सुमारास पूर्व वैमनस्यातून बंद वाढले. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली असतांना वाद घालणाऱ्यांपैकी एकाने हवेत गोळीबार केला. यामुळे जमलेले तेथून लागलीच निघाले.

या घटनेची माहिती मिळताच, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अक्रम शेख, प्रीतम पाटील आणि शार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हवेत गोळीबार करणाऱ्या एकाला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणांतील संशियितांची कसून चौकशी सुरु असून, च्यावर यापूर्वी देखील एका गंभीर गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात तो जामीनावर सुटून बाहेर आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.