जी. एच. रायसोनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ हर्षोल्हासात !

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव (Jalgaon), जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या सर्व विभागातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच महाविध्यालयाच्या खुल्या सभागृहात पार पडला. यावेळी विध्यार्थ्यांसाठी विविध सांस्कुतिक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शूभेच्छा देण्यात आल्या. या सामूहीक कार्यक्रमाचे अध्यक्ष रायसोनी महाविद्यालयाचे उपसंचालक व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा हे होते. तर अॅडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, मॅकेनिकल अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. डॉ. मुकुंद पाटील, सिव्हील अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. शंतनू पवार, आर्टीफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्स विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रमोद गोसावी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशनचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. तुषार पाटील,

प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वडद्कर हे व्यासपीठावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी नमूद केले कि, अभियंता सकारात्मक मार्गाने स्वतःची व समाजाची दिशा बदलवू शकतो. यानंतर अॅडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी मार्गदर्शन केले कि, विध्यार्थ्यानो जर तुम्ही पूर्ण झोकून देऊन मेहनत केली तर तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल. दर्जेदार व प्रामाणिक, सचोटीने काम करा. यश तुम्हाला शोधत येईल. यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशनचे विभाग प्रमुख प्रा. तुषार पाटील यांनी आजच्या बदलत्या ओद्योगीक जगाचा आढावा घेत प्रत्येक व्यवसायात टेक्नोलॉजीला किती महत्व आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी व समन्वयक म्हणून प्रा. वसीम पटेल, प्रा. योगेश वंजारी, प्रा. तुषार वाघ, प्रा. मनीष महाले, प्रा. पवन धोने, प्रा. शीतल जाधव, प्रा.शुभम घोष यांनी पार पाडली. यावेळी विविध विभागातील सहभागी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने झाली तसेच यावेळी विध्यार्थ्यांसाठी सुरुची भोजनाचेही आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.