‘ठरलं तर मग’ ह्या दिवशी पार पडेल परिणीती चोप्राचा साखरपुडा

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आप खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्या लग्नाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा रंगल्या होत्या. येत्या १३ मे रोजी दोघांचा साखरपुडा (Engagement) दिल्ली येथे पारंपरिक पद्धतीने पसार पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दोघांचेही कुटुंबातील सदस्य आणि मोजकेच खास मित्र उपस्थित राहणार आहे. परिणीतीने खास थीम ठेवली असून, लवकरच प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) देखील दिल्लीसाठी रवाना होणार आहे.

परिणीती चोप्रा-आणि राघव दोघंही पंजाबी असल्याने पंजाबी पद्धतीने साखरपुडा पार पडणार आहे. साखरपुड्याच्या तयारीसाठी परिणीती अगोदरच दिल्लीला रवाना झाली आहे. ड्रेसपासून ते डेकोरेशन पर्यंत सर्व थीमनुसार तयार केले जात आहे. राघव आणि परिणितीचा साखरपुडा हा वैयक्तिक कार्यक्रम असेल, ज्यात मोठे मोठे कलाकार उपस्थित राहू शकतात. दोघांच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आली नसली, तरी ऑक्टोबर मध्ये लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.