स्व.रामराव जीभाऊ स्मृती शेतकरी सहकार पॅनेलची विजयी घौडदौड…

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) निवडणूक (Election) सुरू असून, विरोधी पक्ष नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे. सोबत आज सकाळीच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाल्याचे समोर येत आहे. जळगावात नूतन मराठा मतदान केंद्रावर बोगस मतदानावरून अपक्ष उमेदवाराने हरकत घेतल्याने गोंधळ झाला पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप प्रणीत पॅनलचे उमेदवार आघाडीवर असल्याचा कल दिसून आला आहे. या अनुषंगाने विजयी उमेदवारांसह त्यांच्या सहकार्‍यांनी जल्लोषास प्रारंभ केला आहे. ग्रामपंचायत ४, सोसायटी महिला 2, व्यापारी 1, हमाल मापाडी 1 आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महायुतीच्या स्व.रामराव जीभाऊ स्मृती शेतकरी सहकार पॅनेलची विजयी घौडदौड सुरु असल्याचे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.