धक्कादायक; भिवंडीत इमारत कोसळून 40 ते 50 जण अडकल्याची भीती

0

भिवंडी, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

भिवंडी (Bhiwandi) मध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. वलपाडा परिसरात 3 मजली इमारत कोसळली असल्याची माहिती समोर आली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 40 ते 50 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलासह पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. अद्याप या दुर्घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नसल्याचं वृत्त समोर येत आहे. हि घटना आज दुपारी १२ वाजता घडली आहे. परिसरात भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. भिवंडीत वलपाडा परिसरातील ही इमारत आहे.

असे सांगण्यात येत आहे इमारतीच्या खालच्या भगत गोदाम होते यामध्ये 20 ते 30 जण काम करत होते. तर वरती रहिवासी होते. जीवितहानी होण्याची मोठी भीती वर्तवण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली असलेल्यांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.