देवदूत बनून पोलीस नाईक प्रदीप नन्नवरे यांनी वाचवले नागरिकांचे प्राण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

रमजान ईद (Ramadan Eid) व अक्षय तृतीया (Akshaya Tritiya) असल्याने सध्या शहरातील बाजारामध्ये नागरिकांची गर्दी अधिक आहे. सोमवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास टॉवर चौकाकडून घाणेकर चौकाकडे रिक्षा क्रमांक एमएच.१९.सीडब्ल्यू.४५९० जात होती. महात्मा फुले मार्केटच्या समोर विद्युत डीपी जवळून रिक्षा घेऊन जात असताना बाहेर आलेली विद्युत तार रिक्षाच्यावरील पाईपमध्ये अडकली. आणि त्याच वेळेस एक देवदूत धावून आले.

‘देवतारी त्याला कोण मारी’ याच प्रत्यक्ष अनुभव जळगावकरांनी घेतला. सोमवारी सायंकाळी भर बाजारात महात्मा फुले मार्केटसमोर (Mahatma Phule Market) एक रिक्षाच्या पाईपमध्ये विद्युत तार अडकली आणि रिक्षात विद्युत प्रवाह उतरला. नेमके त्याच वेळी तेथून जात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने ही बाब हेरली आणि देवदूत बनून मदतीला धावून गेला. पोलिसाच्या सतर्कतेने गर्दीत अनेकांचे प्राण वाचले.दरम्यान, चालक दीपक बन्सीलाल देवराज (रा.मोहन नगर) यांच्या हाप्रकार लक्षात येताच ते बाहेर पडले. पण, तोवर रिक्षात विद्युत प्रवाह संचारल्याने दीपक देवराज यांना देखील झटका बसला. शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रदीप नन्नवरे हे प्रतिबंधात्मक कारवाईतील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा येथे हजर करून पुन्हा पोलीस ठाण्याकडे जात असताना त्यांना तो प्रकार दिसला. त्यांनी लागलीच गाडी थांबवून दीपक यांचे प्राण वाचवले.

Leave A Reply

Your email address will not be published.