एरंडोल येथे भर दिवसा चाकूचा धाक दाखवत एक लाखाची लूट…

0

 

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

एरंडोल येथे पद्मालय गॅस एजन्सीच्या समोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर डिव्हायडर जवळ दोन अज्ञात इसमांनी पद्मालय गॅस एजन्सीचे कर्मचारी राजेंद्र पाटील यांच्याकडून भर दिवसा दुपारी एक वाजेच्या सुमारास चाकूचा धाक दाखवून एक लाख रुपये जबरीने लूट केल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त अये कि,राजेंद्र पाटील हा एरंडोल येथील पद्मालय गॅस एजन्सीवर असिस्टंट मॅनेजर म्हणून वीस वर्षापासून नोकरी करतो. 27 मे 2024 रोजी राजेंद्र पाटील हे नेहमीप्रमाणे गॅस एजन्सीचे चार लाख 91 हजार पाचशे रुपये चा भरणा करण्यासाठी एकटा दुचाकीने निघाला होता.बँकेत जात असताना,दोन अज्ञात चोरट्यांनी विना नंबर प्लेट असलेल्या दुचाकीने येत राजेंद्र उत्तम पाटील यांच्याजवळील पांढऱ्या रंगाच्या पिशवीतील एक लाख रुपये जबरीने लूटले. यावेळी एजन्सीच्या कर्मचाऱ्याने दोघांना प्रतिकार केला असता एकाने चाकूचा धाक दाखवून धमकी दिली,त्यावेळी तिघांमध्ये झटपट झाली आणि पांढऱ्या पिशवी मधील पाचशे रुपये दराच्या शंभर नोटांचे दोन बंडल खाली पडले ते पैसे घेऊन दोघ चोरट्यांनी पळ काढला.
यानंतर राजेंद्र पाटील याने गॅस एजन्सी चे मालक अशोक पाटील व त्याच्या एजन्सीच्या सहकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. या घटनेबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला पाच दिवसांनी शुक्रवारी 31 मे 2024 रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.