मुक्ताईनगर येथे डंपरच्या धडकेत एकाचा मृत्यू…

0

 

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

तहसील कार्यालयाची कोणतीही परवानगी नसताना शहरा लगत असलेल्या पूर्णा नदी पात्रातून क्षमतेपेक्षा जादा भार गाळ वाहून नेणाऱ्या डंपरने एका इसमास चिरडल्याची घटना घडली आहे. इतकेच नाही तर १८ टन भार वाहून नेण्याची क्षमता असताना सुमारे ४० टनापर्यंत जादा वजनाचा भार असलेला गाळ भरलेला डंपर पोलिसांच्या परवानगीशिवाय घटना स्थळावरून अन्यत्र खाली कसा केला गेला ? दरम्यान या घटनेमुळे अवजड वाहनांच्या अवैध वाहतुकीमुले पुन्हा एकाचा बळी गेला आहे.
शहराच्या मुख्य बऱ्हाणपूर-बोदवड कडे जाणाऱ्या रस्त्यावर क्षमतेपेक्षा जादा भार वाहून नेणाऱ्या वाहनांकडे मुक्ताईनगर पोलिसांनी सतत कानाडोळा केला आहे. तर मुक्ताईनगर शहरा नजीक राज्य परिवहन आर.टी.ओ. व प्रशासनाच्या आशीर्वादाने हि अवैध वाहतूक सुरु आहे, त्यामुळे हा नाहक बळी गेला आहे. याचा हा प्रत्यक्ष पक्का पुरावा आहे. कारण मुक्ताईनगर पोलीस तसेच जळगाव आर.टी.ओ. कार्यालयाचे भरारी पथक पाऊसपडेपर्यंत या क्षमतेपेक्षा जादा गाळ/गौण खनिज वाहतूक करणारांचा मार्ग न अडविण्याचा मोबदला कदाचित दरमहा आगाऊच वसूल करून घेत असावे. त्यात भलेही लोकांचे जीव जावो? अशा चर्चेसही उधाण आले आहे.
दरम्यान या संदर्भात फिर्यादी अर्जुन लालसिंग वासकले (28) पोकलॅण्ड ऑपरेटर रा.जासवंदी तालुका जिल्हा बऱ्हाणपूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक 29 मे रोजी वेळ दुपारी दीड वाजेच्या सुमारास पूर्णा नदीच्या काठी संदीप कैलास जोंधळे (43)हा गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांची नोंद करीत होता.परंतु हे करीत असताना नंबर MH19 CY 3569 चालक नाव माहित नाही या वाहनाच्या खाली येऊन संदीप कैलास जोंधळे (रा. निमगाव जाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर) याचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या संदर्भात रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.