कपाशी बियाणे विक्री २० मे पासून सुरू करावी, कृषि अधिकारी यांना निवेदन

0

भडगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

महाराष्ट्र शासनाने कुषी विभागाकडुन महाराष्ट्रात 1 जुन पासून कपाशी बियाणे विक्री करण्याचे आदेश कृषी विभागाकडुन कृषि विक्रेत्यांना देण्यात आले असुन यासंदर्भात भडगाव तालुका सिडस, पेस्टीसाईड, फटिलाझर अशोशियन व कुषी विक्रेते यांची भडगाव येथे बैठक घेऊन महाराष्ट्र राज्यात व विशेषतः जळगाव जिल्ह्यात २० मे पासून कपाशी बियाणे विक्री संदर्भात परवानगी देण्यात यावी यासंदर्भात चर्चा करुन भडगाव तालुका सिड्स पेस्टीसाईड फर्टीलायझर्स असोशिसनच्या वतीने आज भडगाव तालुका कुषी अधिकारी बी.बी. गोर्डे तसेच पंचायत समिती कृषि अधिकारी ईश्वर देशमुख यांना त्या मागणी संदर्भात निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यांमध्ये विहिरींना पाणी पातळी चांगली आहे तसेच जळगाव जिल्ह्यात काही भागात पाणी पातळी चांगली असल्याने भडगाव तालुक्या सह इतर तालुक्यातील कपाशी ही ठिबक सिंचनाद्वारे लागवड शेतकरी वर्ग करत असतो त्यामुळे ज्या शेतकरी वर्गाजवळ पाण्याची सोय आहे तो शेतकरी वर्ग हे २० मे पासूनच कपाशी लागवड करण्याची घाई करतात त्यामुळे जर आपल्या जळगाव जिल्ह्यात किंवा महाराष्ट्र राज्यात जर बियाणे हे १ जुन पर्यत विक्री होत नसल्याने जळगाव जिल्ह्यातील बरेच शेतकरी वर्ग हे आपल्या जिल्ह्यातील शेजारच्या राज्यातून कपाशी बियाणे विकत घेऊन लागवड करतात त्यामुळे त्यांची जास्त भावाने कपाशी बियाणे घेऊन शेतकरी वर्गाची फसवणुक होतं असते तसेच अनाधिकृत विक्रेत्यांन कडून शेतकरी वर्ग बोगस बियाणे खरेदी करतात त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते मागील वर्षी कपाशी बियाणे विक्री उशिरा सुरू झाल्यामुळे बरेच शेतकरी वर्गानी बाहेरून बियाणे आणले त्यात काही शेतकर्याची फसवणुक झाली होती यामुळे शासनाने १ जून या तारखे ऐवजी २० मे या तारखेपासुन कपाशी बियाणे विक्री करण्यास परवानगी आम्हाला देण्यात यावी असे निवेदन देण्यात आले. यावेळी भडगाव तालुका अध्यक्ष दिपक पाटील स्वामी समर्थ कृषी केंद्र बोदर्डे, उपाध्यक्ष मनोज पाटील गजानन अँग्रो एजन्सीज भडगाव आदी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.