संपात सहभागी झाल्यास महापालिका प्रशासनाची नोटीस

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी अनेक कर्मचारी संपावर आहे. मात्र, महापालिकेतील एकही कर्मचारी संपात सहभागी नसल्याचे सांगण्यात येत आहे. सोबतच जे कर्मचारी बेमुदत संपावर असतील त्यांना शिस्त भंगाची नोटीस पाठविण्यात येणार आहे. महापालिकेच्या कर्मचारी संघटनेने संपात सहभागी होण्याचे अवाहन केले आहे. मात्र, महापालिकेचा एकही कर्मचारी संपात सहभागी नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत अस्थापन अधीक्षक लक्ष्मण सपकाळे यांनी सांगितले, की महापालिकेच्या आस्थापनावरील सर्व कर्मचारी कामावर आहेत. एकानेही संपात सहभागी असल्याचे सांगितलेले नाही. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने राज्य शासनाच्या आदेशानुसार आदेश काढले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here