वरणगाव नगरपरिषदतर्फे डफडे वाजवून कर वसुली

0

वरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील कर थकबाकीदारा कडून त्यांच्या घरासमोर डफडे वाजून सुमारे तीन ते साडेतीन लाखाची वसुली केली.

ग्रामपंचायत कार्यकाळा पासून ते नगरपालिका स्थापन झाल्या नंतर सन 2020/21च्या करवाढी प्रस्तावा नंतरही कर दाते कर भरत नसल्याने व त्यात शासनाचे वित्त आयोगाचे,विशेष अनुदानाचा निधी नगरपरिषदेला मिळाला नसल्याने नागरिकसुविदा पुरविण्यास किंवा विकास कामे करण्यासाठी परिषदेला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असल्याने आज दि.14 मंगळवार रोजी मुख्याधिकारी शेख समीर यांनी शहरातील कर दात्या कडील करवसुली साठी दोन पथकाची नियुक्ती करून करदात्यांच्या घरा समोर डफडे वाजून व त्यांचा पाणीपुरवठा तात्पुरता बंद करून कारवाही करत सुमारे तीन लाख पन्नास हजार रुपये चा कर नारपरिषदेच्या तीजोरीत जमा केला. नागरिकांना कडून सुमारे तीन ते चार कोटी रुपये कर थकबाकी येण्याचे अपेक्षित असून नागरिकांनी वेळेवर आपल्या कडील कर थक बाकी भरून नगरपरिषदेस सहकार्य करून आपल्या वरील कटू कारवाई टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या वसुली पथकात पंकज सुर्यवंशी,आझाद पटेल,निशांत नागरे,सुधाकर मराठे,अनिल तायडे,राजु सोनार,राजु गायकवाड,गणेश कोळी,प्रशांत माळी, कृष्णा माळी, गोकुळ भोई, गोमा भोई, गंभीर कोळी,संगीता भैसे, योगेश धनगर इत्यादी कर्मचारी होते

 

Leave A Reply

Your email address will not be published.