जिल्हा न्यायालयाच्या आवारात विवाहितेचा विनयभंग

0

जळगाव ; लोकशाही न्यूज नेटवर्क
अश्लिल शिवीगाळ करत एका विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना जळगाव शहरातील जिल्हा न्यायालयाच्या आवारात घडली. याप्रकरणीदोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एका भागातील रहिवासी विवाहिता राहते, कौटुंबिक वादाबाबत तिने न्यायालयात तक्रार केली असून या केसच्या तारखेवर मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास विवाहिता ही जिल्हा न्यायालयात गेली होती, यादरम्यान विवाहितेचा पती व त्याच्यासोबत एक जण असे दोघे सुध्दा जिल्हा न्यायालयात आले होते, यावेळी पतीसह त्याच्यासोबतच्या व्यक्तीने विवाहितेला अश्लिल हातवारे करत तसेच अश्लिल शिवीगाळ करत विवाहितेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, याबाबत विवाहितेने जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे, या तक्रारीवरुन तिच्या पतीसह एका जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिलीप पाटील हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.