संत बाबा गेला राम साहेब यांच्या जन्मोत्सव निमित्त सामूहिक जनेउ कार्यक्रम पार पडला

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

संत बाबा गेला राम साहेब यांच्या जन्मोत्सव निमित्त 93 मुलांचा सामूहिक जनेउ कार्यक्रम अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट द्वारा संचालित पूज्य सेवा मंडळ येथे कंवर नगर येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण सेवा मंडळ परिसरात भोपाल, बैरागढ, मुंबई, उल्हानगर ,सतना, अकोला, अमरावती, नागपूर ,इटारसी, हरदा, अश्या विविध शहरातील भाविक गण आपल्या सामूहिक जानेउ संस्कार ज्या मुलांवर होणार आहे. त्या मुलांसह दाखल झालेले होते. कंवर नगर परिसरातील पूज्य सेवामांडल परिसर अतिशय सुंदरपणे सजविला होता. संत बाबा हरदास राम व बाबा गेला राम साहेब यांच्या देवरी साहेब वर अतिशय सुंदर देखावा करण्यात आले होता. शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अमर शहीद संत कंवर राम ट्रस्ट चे सर्व सदस्य गण व बाबांचे सेवेकरी परिश्रम घेतले असून महिला व भगिनींनी परिश्रम घेतले होते. या सर्व कार्यक्रममध्ये सामील होऊन संत बाबा हरदास राम साहेब व पूज्य बाबा गेलाराम साहेब यांच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा असे आव्हान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.