एसटीची दुचाकीला धडक ; मनूरचे ३ मित्र जागीच ठार

0

सुसरी पिंपळगाव येथील घटना ; मनूर गावात शोककळा

वरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव बु ॥ येथे विवाह सोहळ्याला आलेल्या तीन मित्रांच्या दुचाकीला एसटी बसने धडक दिल्याने तीन जण ठार झाल्याची घटना आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास सुसरी पिंपळगाव जवळ घडली असून तिघे मयत हे मनूर ता. बोदवड येथील रहिवाशी आहेत.

बोदवड तालुक्यातील मनुर येथील शेळके परिवारात विवाह असल्याने सचिन राजेंद्र शेळके ( २६ ) , भागवत प्रल्हाद शेळके ( ४२ ) , जितेंद्र कैलास चावरे ( ३३ ) रा मनुर हे विवाह मुहुर्तास वेळ असल्याने दुचाकी . (एम , एच , १९ सी एस ११९८ )या मोटर सायकलने वरणगावकडे जात असताना पिंपळगाव बु ॥ जवळील बढे हायस्कूल जवळ वरणगावकडून येणाऱ्या एस टी क्र( एम एच २० बी एल ०९४६) बस याच्यात समोरा समोर धडक दिल्याने तिघे मित्र जागीच ठार झाल्याची घटना घडली. याघटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मनूर गावात शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.