नवजात शिशुंसह बालकांवर मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध

0

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातर्फे अभियान

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
नवजात शिशु आणि बालकांच्या कुठल्याही आजाराविषयी आता चिंता करण्याची गरज नाही. शिशुंसह बालकांच्या सर्व प्रकारच्या आजाराची तपासणी, निदान आणि उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रुग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभाग आणि बालरोग विभागात अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात विशेष अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत कमी वजनाचे बाळ, अपूर्ण दिवसाचे बाळ, काविळ, जंतुसंक्रमण, जन्मदोष, फुफ्फुसाचे आजार यावर मोफत उपचार केले जाणार आहेत. नवजात अर्भकांसाठी मोफत पेटीची (वॉर्मर) व्यवस्था/ लहान मुलांचा व्हेंन्टीलेटर्स विभाग स्वतंत्ररित्या कार्यान्वीत आहेत. तसेच बालरोग विभागात न्यूमोनिया टायफाईड, काविळ, लहान मुलांचा पॅरालिसिस, हृदय श्वसननलिका व अन्ननलिकेचे आजार, मेंदूचे झटके येणे, डोक्यात ताप जाणे, अर्धांगवायूचा झटका, मांसपेशीचे जनुकीय विकार, हाता-पायाला अपंगत्व येणे अशा सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातील.

बालकांवरील उपचारासाठी अनुभवी पेडियाट्रिक सर्जन्ससह बालरोग तज्ञांची टिम कार्यरत आहे. उपचारासाठी आधार कार्ड व रेशन कार्ड आवश्यक असुन डॉ.रोहिणी देशमुख यांच्याशी ९९७०२७७८३९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.