धक्कादायक; भावाच्या अत्याचाराला कंटाळून मुलीने घेतला गळफास…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

एका विकृताने आपल्याच चुलत बहिणीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ज्यामुळे कंटाळून १४ वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बाल लैगिक अत्याचारासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी २१ वर्षीय चुलत भावावर गुन्हा दाखल करून रविवारी अटक करण्यात आली आहे.

मागील अनेक दिवसांपासून आरोपी मुलीवर अत्याचार करत असल्याने ती मानसिक तणावात होती. या पूर्वीही तिने बहिणीच्या लग्नात आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र ती त्यावेळेस थोडक्यात वाचली. दरम्यान आरोपीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अपमृत्यूची नोंद केली होती. तपासादरम्यान पोलिसांना पीडित मुलीने लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यात पीडित मुलीने २१ वर्षीय आरोपीने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याबाबत माहिती दिली होती. त्यावर आरोपीच्या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी स्वतः या प्रकरणी तक्रार दाखल करून गुन्ह्याची नोंद केली. आरोपीविरोधात भादंवि कलम ३५४, ३०५ सह कलम ८, १२, १८ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.