“मास्वे” चे उपोषण व धरणे आंदोलन

0

जळगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यातील अनुदानित समाजकार्य महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासनाला वेळोवेळी निवेदने देवून व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटूनही अद्याप प्रलंबित आहेत. समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना शासना तर्फे (ते ही ज्या विभागाचे नाव सामाजिक न्याय विभाग आहे त्यांच्या तर्फे) सातत्याने अन्याय व भेदभावाची वागणूक का दिली जाते? असा प्रश्न समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र असोशिएशन ऑफ सोशल वर्क ऐज्युकेटर्स (मास्वे) संघटनेने उपस्थित केला असून शासनाच्या अल्यायकारक भुमिकेच्या निषेधार्थ गुरुवार दिनांक 16 मार्च 2023 रोजी प्रादेशिक उपायुक्त (समाज कल्याण), नागपूर विभाग, नागपूर यांच्या कार्यालया समोर उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येणार असून त्यात समाजकार्य महाविद्यालयाचे कर्मचारी, विद्यार्थी सहभागी होणार आहेत. शासनाच्या विविध विभागात ज्या पदांकरीता समाजकार्य पदवीधर ही शैक्षणिक अर्हता आहे त्यात बदल करण्यात येवू नये वरील मागण्यांची शासनाने तातडीने पुर्तता करावी अन्यथा दिनांक 16 मार्च रोजी आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असे “मास्वे” संघटनेने शासनाला कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.