बापानेच केला मुलीचा विनयभंग…

0

 

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क:

वडीलांनी आपल्या स्वतःच्या 13 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वडीलांच्या दुसऱ्या लग्नाला विरोध केल्याने हा प्रकार घडल्याचे वृत्त आहे. पत्नीचं निधन झालं आणि त्यानंतर वडील दुसऱ्या लग्नाचा विचार करत होते. हे सगळं मुलीला पटलं नाही त्यामुळे मुलीने वडीलांना दुसऱ्या लग्नासाठी विरोध केला होता. त्यानंतर वडीलांनीच तिचा विनयभंग केला असल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अल्पवयीन मुलीच्या आईचे निधन झाल्यानंतर वडीलांना दुसरे लग्न करायचे होते. मात्र मुलीने यांचा त्यास विरोध दर्शवला. या विरोधामुळे अल्पवयीन मुलीचे वडील संतापले होते. त्यानंतर त्यांनी स्वत:च्याच लेकीला शिवीगाळ केली. घरात वावरत असताना तिला त्रास दिला. एकटी असताना पाहून मुलीच्या गुप्तांगाला हात लावून विनयभंग केला. तसंच आजीनेही त्या मुलीला मानसिक त्रास दिला. मुलगी आजीला विनाकारण मारहाण करते म्हणत तिची बदनामी केली. दरम्यान याप्रकरणी मुलीने वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मुलगी कर्वेनगरमध्ये राहते. या मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. त्यानुसार पोलिसांनी तक्रारदार अल्पवयीन मुलीचे वडील आणि आजीविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार 2020 पासून आजपर्यंत घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.