राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि जळगाव जिल्हा महानगर तर्फे सदस्यता नोंदणी अभियान व लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

 जळगाव ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात सदस्यता नोंदणी करण्यात येत आहे , त्याचाच एक भाग म्हणुन जळगाव जिल्हा महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि तर्फे आज दिनांक 29 जानेवारी 2022 रोजी शनिवारी सकाळी 10 वाजता मेहरुण येथील रामेश्वर कॉलनी परिसरातील आदित्य चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टिचे जिल्हाध्यक्ष श्री. रविंद्र भैय्या पाटिल यांचे शुभहस्ते सदस्यता नोंदणी अभियानास व 15 ते 18 वर्षे वयोगटातील युवक व युवतींसाठी कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली .

याप्रसंगी जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , प्रदेश चिटणीस एजाजभाई मलिक ,  राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ . वंदनाताई चौधरी , ओबीसी सेलच्या जिल्हाअघ्य सौ. अश्विनीताई देशमुख , अल्पसंख्याक जिल्हाअघ्यक्ष मजहरभाई पठाण , शहर संघटक राजुभाऊ मोरे , सरचिटणीस सुनीलभैय्या माळी , उपंअघ्यक्ष अमोल कोल्हे , किरण राजपूत , सरचिटणीस रहीम तडवी , जिल्हाउपंअघ्यक्ष मिनाक्षीताई चव्हाण ,  ऍड. सचिन पाटिल , सुशील शिंदे , संजय जाधव , संजय हरणे , जितू बागरे , शहर कार्यलय मंत्री राहुल टोके आदि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महानगर उपाध्यक्ष यशवंत पाटिल व जिल्हा महानगर सरचिटणीस विशाल देशमुख यांनी केले . कार्यक्रमासाठी रामेश्वर कॉलनी येथीलराष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले .सदर सदस्य नोदणी अभियानात २०३ सदस्य नोदणी झाली व १५ ते १८ युवक / युवती साठी मोफत लसीकरण मोहीमेत १८० सहभाग घेऊन लसीकरण करण्यात आले .

यावेळी अँन्ड भैय्यासाहेब रविंद्र पाटील यांनी कार्यकत्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदस्य नोदणी करताना गरीब होतकरु नागरिकांना ज्याकाही आडजणी असती तहसील कचेरी , सिव्हिलहाँस्पिटल , विधवा महिला साटी पगाराबाबत रेशन धान्य दुकान बारकोड बाबत  त्या सोडून दिल्या पाहिजे असे आव्हान सदस्य नोंदणी अभियान निमित्ताने केले .

Leave A Reply

Your email address will not be published.