जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन लेडींज विंगतर्फे हॅप्पी स्ट्रीटचे आयोजन

0

लोकशाही न्युज नेटवर्क
काव्यरत्नावली चौक जळगाव येथे जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (JITO) लेडीज विंग तर्फे जैन स्पोर्टस अकॅडमी व युवाशक्ती फाऊंडेशनच्या सहकार्याने “हॅप्पी स्ट्रिट” या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि. २९ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ६.३० ते १०.३० वाजे दरम्यान करण्यात आले आहे. यामध्ये योग, झुंबा, बॅडमिंटन, बुद्धीबळ, लुडो, कॅरम, बास्केटबॉल, रस्सीखेच, तायक्वांदो, स्केटींग, चित्रकला, विनामुल्य आरोग्य तपासणी ( BMI व बोन डेन्सीटी तपासणी), आरोग्यवर्धक खानपानाचे स्टॉल्स, टॅटू, सायकलींग, नृत्य, मल्लखांब इ. विषयांचा समावेश यामध्ये आहे. या आयोजनासाठी प्रेम कोगटा, महेंद्र रायसोनी, जितेंद्र कोठारी, एवन बागरेचा, प्रदिप जैन, लखीचंद जैन यांचे सहकार्य लाभणार आहे.

हा कार्यक्रम जळगवाकर नागरिकांसाठी खुला असून ५ वर्षापासून ते ९० वर्षांपर्यतचे नागरिक यामध्ये सहभागी होऊन वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांचा आनंद घेऊ शकतात. या ठिकाणी सहभागी होणाऱ्या नागरिकांमधून लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी तसेच मानवी आयुश्यात क्रीडा प्रकाराचे महत्त्व कळावे यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही क्षण कुटुंबासह घालविण्यासाठी तसेच कुटुंबातील सदस्यांसोबत वार्तालाभ वाढावा हा या आयोजनामागील उद्देश आहे. सदर कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारची नोंदणी अथवा नोंदणी फी आकारण्यात आली नसून ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांना थेट कार्यक्रमास्थळी येऊन सहभाग घ्यावयाचा आहे.

या हैप्पी स्ट्रिट मध्ये सहभागी होण्याचे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय महेश्वरी, श्री सकल जैन संघ जळगाव चे संघपती दलिचंद जैन, जैन इरिगेशन सिस्टम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन यांनी चित्रफितीच्या माध्यमाने केले आहे.

तरी जळगावकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये सहपरिवार सहभागी होऊन या मनोरजनात्मक कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन अध्यक्ष निता जैन शीतल जैन ,सुलेखा लुंकड , विराज कावडीया , प्राजक्ता चोरडिया ,कविता भंडारी यांनी केले आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.