Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जैन हिल्सवरील प्रात्यक्षिकातून शाश्वत शेतीचा विश्वास – अनिल भोकरे
    जळगाव

    जैन हिल्सवरील प्रात्यक्षिकातून शाश्वत शेतीचा विश्वास – अनिल भोकरे

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 15, 2023Updated:February 15, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

    मशागत तंत्रज्ञानातील सूक्ष्मबदल, एकात्मीक कीड रोग व्यवस्थापन, गादी वाफेचा वापर, कोरडवाहू फळबाग लागवड, लागवड पद्धतीच्या तंत्रज्ञानातील बदल, सूक्ष्मसिंचनातून खते देणे, फर्टिगेशनच्या तंत्रज्ञानातील वापर जैन हिल्सवरील संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर दिसत आहे. यातून हजारो शेतकऱ्यांना आधुनिक शाश्वत शेतीचा विश्वास निर्माण होत आहे, असे कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी सांगितले.

    जैन हिल्सवर सुरू असलेल्या शेतकरी अभ्यास दौरानिमित्त अनिल भोकरे यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. अभ्यास दौरावेळी त्यांच्यासोबत वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ बी. डी. जडे, डी.एम. बऱ्हाटे, श्रीराम पाटील यांच्यासह जैन इरिगेशनचे सहकारी व शेतकरी उपस्थित होते. गेल्या ५ फेब्रुवारी ते १५ मार्च दरम्यान जैन हिल्सवरील  कृषी संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर देशभरातून शेतकरी भेटी देत आहेत.

    याठिकाणी आधुनिक शेती करीत असतांना मुख्य भेडसावणार प्रश्न म्हणजे मजुरांची टंचाई यासाठी यांत्रिकरणाचा सुरेख संगम दिसते. आगामी शेती आणि सद्यस्थितीमधील शेतीतील प्रश्न यावर येथे शाश्वत उपाय सापडतात. कोरडवाहू फळबाग लागवड, कमी जागेत कमी पाण्यात उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न कसे वाढता येईल याचे प्रात्यक्षिक जैन हिल्सवर बघायला मिळते. शेतकऱ्यांच्या स्थानिक प्रश्नांवर आधुनिक तंत्रज्ञानाची आणि कमी खर्चाची शाश्वत उत्पादन घेण्याची सांगड याठिकाणी दिसून येत असल्याचे अनिल भोकरे म्हणाले. तंत्रज्ञानातून किफायतशीर काटेकोर पद्धतीने शाश्वत शेतीचा मार्ग शेतकऱ्यांना गवसत आहे. माझ्यापासून ते शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पादनापासून ते प्रक्रिया उद्योगापर्यंत यातून शेतीवरचा वाढता खर्च कमी करून योग्य तो सकारात्मक बदलांसह कांद्याची किफायतशीर शेती कशी करावी असा संदेश या अभ्यास दौरातून मिळत आहे. या अभ्यास दौऱ्यात कृषिविभागातील अधिकारी, अभ्यासक यासह शेतकऱ्यांनी भाग घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

    Anil Bhokare farmer Jain Hills jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif