कार व दुचाकीची जबर धडक, १ जण ठार, दुसरा गंभीर जखमी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अमळनेर, तालुक्यातील अमळगावाजवळ चुकीच्या मार्गाने येऊन भरधाव कारने दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात ५१ वर्षीय महिलेला मृत्यू झाला, तर त्यांच्या मुलगा दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील दोधवड येथे भूषण उत्तम मोरे हा तरुण आपल्या परिवासह वास्तव्याला आहे. २२ ऑक्टोबर रोजी भूषण भोई हा त्याची आई बेबीबाई भोई त्यांच्यासोबत दुचाकी (एमएच-१९, डीएक्स-९४७६) ने मळगाव येथे जात असताना समोरून चुकीच्या मार्गाने येणारी कार (एमएच १८, एजे २०४६) ने दुचाय जबर धडक दिली. या धडकेत बेबीबाई यांचा जागीच मृत्यू झाला तर भूषण हा जखमी झाला आहे. त्याला उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी राहूल भिकन भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारवरील चालक विजय चुडामण धोबी (रा. अमळगाव, ता. अमळनेर) याच्याविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ विजय भोई करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.