विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे यांच्याकडून स्थानिक नागरिकांच्या भावनांचा आदर…

0

 

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

भुसावळ स्थानकाच्या दक्षिण दिशेकडील रेल्वे कोच रेस्टॉरंटसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्या पार्टीला रेल्वेने रेल्वे कोच रेस्टॉरंट चालवण्यास मंजुरीचे पत्र दिले होते. आणि त्या ठिकाणी रेस्टॉरंटसाठी रेल्वेचा डबा ठेवण्यात आला होता.

विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या पाहणीदरम्यान रेल्वे डब्याजवळ शिवाजी महाराजांचा पुतळा स्थपित असून, रेल्वे कोच रेस्टॉरंटमधून शिवाजी महाराजांचा पुतळा पाहण्यात अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. यासोबतच स्टेशन आणि बगीचा सौंदर्यावर परिणाम होत होता. या बांधकामामुळे शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या भावनाही दुखावल्या गेल्या होत्या. वृत्तपत्रांतूनही रेल्वे कोच हटवण्याची मागणी सातत्याने होत होती. त्यामुळे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे यांनी शहरातील नागरिकांच्या भावना समजून घेत स्थानिक प्रशासनाच्या मदतीने रेल्वे कोच निविदा रद्द करत रेल्वे कोच लिलाव केला आहे. भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक भुसावळमधील नागरिकांचा आदर राखत भुसावळ शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.