इराकमध्ये विवाह सोहळ्यात आग; ११४ जणांचा होरपळून मृत्यू

0

मोसूल : युद्धग्रस्त इराकमध्ये ख्रिश्चनधर्मीय विवाह सोहळ्यात फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना बुधवारी अचानक आग लागल्याची घटना घडली. खचाखच भरलेल्या मंगल कार्यालयात आगीचा भडका उडाला. यात किमान ११४ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून १५० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये काही बालकांचाही समावेश आहे.

उत्तर इराकमधील निनवे प्रांतातील हमदानिया परिसरात ख्रिस्ती विवाह सोहळा सुरू होता. मंगल कार्यालयातील एका झुंबरमध्ये आगीची ठिणगी पडली. बघता बघता या आगीचे लोण सर्वत्र पसरले. ज्वलनशील सामग्री मोठ्या प्रमाणावर आगीच्या कचाट्यात आली. त्यामुळे मोठा भडका उडाला व काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केले.

वधू-वर नाचण्यासाठी लग्नाच्या मिरवणुकीत जात असतानाच आगीचा भडका उडाला, त्यामुळे ते बचावले.
आगीच्या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पंतप्रधान मोहम्मद शिया अल- सुदानी यांनी दिले आहेत.
अनेक जखमी सध्या ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. त्यांच्यासाठी अतिरिक्त ऑक्सिजन मागवण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.