IPS मनोज शर्मा यांची पोलिस महानिरीक्षकपदी पदोन्नती…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

कारकिर्दीतील महत्त्वाच्या कामगिरीमध्ये, आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांना महाराष्ट्र पोलिसात उपमहानिरीक्षक (डीआयजी) ते महानिरीक्षक (आयजी) म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) 2003, 2004 आणि 2005 बॅचच्या IPS अधिकाऱ्यांच्या पदोन्नती मंजूर केल्यानंतर मनोज शर्मा यांच्या कारकिर्दीतील ही प्रगती झाली आहे.

मनोज शर्मा (ज्यांच्या प्रेरणादायी कथेवर ’12वी फेल’ हा चित्रपट बनला होता) ज्याचा गेल्या वर्षीच्या सर्वात यशस्वी चित्रपटांमध्ये समावेश करण्यात आला होता. आपल्या प्रमोशनच्या बातम्या शेअर करण्यासाठी मनोज शर्माने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मदत घेतली. आपल्या फॉलोवर्सना आनंदाची बातमी शेअर करताना, मनोज शर्मा यांनी भारतीय पोलीस सेवेतील त्यांच्या संपूर्ण प्रवासाबद्दल सांगितले.

 

लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली

त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘एएसपीपासून सुरू झालेला प्रवास आज भारत सरकारच्या आदेशाने आयजी होण्यापर्यंत पोहोचला आहे. या प्रदीर्घ प्रवासात मला साथ दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आणि त्याला खरी प्रेरणादायी कथा म्हटले. एका व्यक्तीने लिहिले, ‘अभिनंदन, मनोज सर. तुमच्या कथेने आम्हाला खूप प्रेरणा दिली, तुम्ही त्यास पात्र आहात. दुसऱ्याने लिहिले, ‘अभिनंदन! तरुण पिढीसाठी तुम्ही खरे प्रेरणास्थान आहात. तर एकाने लिहिले, ‘या देशाला तुमच्यासारख्या स्पष्ट आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांची गरज आहे.’

Leave A Reply

Your email address will not be published.