लोकशाही न्युज नेटवर्क
भुसावळ – येथील संजीवनी ब्लड डोनर ग्रुप (sanjivani blood doner grup) चे सागर विसपुते यांनी मानवसेवा मोफत तृतीयपंथीयांची आरोग्य तपासणी शिबीर ३ रोजी एम. के. इंडस्ट्रीज , मंगल शारदा कॉलनी जवळ आयोजित करण्यात आला होता. या शिबिराचा लाभ २५ तृतीय पंथीयांनी घेतला.
या शिबिरात श्री रिडियम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चे डॉ. महेश पांगळे , डॉ. सय्यद यांनी प्राथमिक आरोग्य तपासणी, रक्तदाब , रक्तातील शुगर , गरजू पेशंटचा ECG काढण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आले. तर नेत्रम हॉस्पिटल चे सुनील मेश्राम यांनी नेत्र तपासणी केली. यावेळी शिबीरात सहभागी नागरिकांसाठी भोजन व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात आली होती. यशस्वीतेसाठी संजीवनी ब्लड डोनर ग्रुपचे सागर विसपुते आणि सदस्यांनी परिश्रम घेतले.


