गूड न्यूज ! श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेत जसप्रीत बुमराहला संधी

0

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क

भारतीय संघासाठी (Team India) गुड न्यूज आहे. बीसीसीआय़ने (BCCI) श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज (fast bowler) जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) संधी देण्यात आली आहे. दुखापतीमुळे बुमराह हा संघाबाहेर होता. मात्र आता तो बुमराह तंदुरुस्त झाला असून श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) एकदिवसीय संघात त्याचा समावेश करण्यात आलाय. तो पुढच्या आठवड्यात होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) होणाऱ्या चार सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीआधी (Border-Gavaskar Trophy) भारतासाठी ही सर्वात मोठी बातमी आहे. बुमराह बऱ्याच काळापासून दुखापतीने त्रस्त होता. आता तो पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, निवड समितीने (Selection Committee) वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला श्रीलंकेविरिुद्धच्या ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत निवडलं आहे.

भारतीय संघ पुढीलप्रमाणे :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), वाशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंह.

Leave A Reply

Your email address will not be published.