गुलाबराव पाटलांची संजय राऊतांवर टिका !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या सहा महिन्यापूर्वी शिवसेनेत (shivsena) मोठा भूकंप घडून आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसह अपक्षच्या एकूण ५० आमदारांनी बंड पुकारले होते. त्यामुळे राज्यात महविकास आघाडी कोसळून शिंदे गट आणि भाजपने सरकार स्थापन केली. आता भाजपचं लोकसभा मिशन, मिशनच्या माध्यमातून बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट आणि भाजप युती असणार आहे. या मिशन बाबत शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

‘भाजपाचे मिशन 145 आहे मात्र बाळासाहेबांची शिवसेना व भाजप आमची युती असणार आहेत. यात युतीचे नेत्यांनी जो निर्णय घेतला यात तो आम्हाला मान्य राहील. यामध्ये शून्य जागा जरी लढवायला लागल्यात तरीआम्हाला मान्य राहील फक्त शिंदे साहेबांनी आम्हाला आदेश करावे’ असं गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

भाजपच्या लोकसभा मिश वरून खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी शिंदे गटावर टीका केली होती. मात्र संजय राऊत यांच्या म्हणण्याला मी भाव देत नाही. कुणीतरी मागच्या दरवाज्याने येणाऱ्या माणसाने हे म्हणावं आणि त्याला आपण मान्यता द्यावी, अशी टीका देखील गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर केली.

Leave A Reply

Your email address will not be published.