मुख्यमंत्री शिंदे यांची राष्ट्रवादीवर टीका !

0

लोकशाही न्यूज़ नेटवर्क 

नागपूर – हिवाळी अधिवेशनात अजित पवार यांच्याकडून झालेल्या विधानावर (vidhanbhavan) राज्यभर भाजपने आंदोलन केली त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कि, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माफी मागावी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इतिहास पुसण्याचे काम वारंवार होत आहे, याचा आम्ही निषेध करतो असे म्हणत राष्ट्रवादीवर टीका केली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, खरे तर अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे (bharmvir chatrapati sambhajiraje) यांच्याबद्दल जे वक्तव्य केले, ते त्यांच्याकडून अपेक्षित नव्हते. अजित पवारांनी जसे महापुरुषांचा अपमान झाला अशी भूमिका घेतली होती. अजित पवारासंकडून छत्रपती संभाजीमहाराज यांच्या बलिदानाचा अपमान झाला आहे. त्यामुळे अजित पवारांनी आता माफी मागायला हवी असे म्हणताना सर्वाना समान न्याय हवा असे म्हणत अजित पवारांवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इतिहास बदलण्याचा आणि पुसण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोपहरी त्यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नागपुरात माध्यमांशी संवाद साधत होते.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे आक्षेपार्ह वक्तव्य विधानसभेत केले होते. त्यावरून त्यांच्यावर सर्वबाजूने टीका होत आहे. अजित पवार यांनी माफी मागावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने दिला आहे. आता राष्ट्रवादीकडूनही अजित पवारांची पाठराखण केली जात आहे.  जितेंद्र आव्हाड म्हणाले की, संभाजी राजेंच्या नाजूक इतिहासात जाऊ नका नाही तर मोठा‌ वाद निर्माण होईल. सावरकर आणि गोळवलकर यांच्या दृष्टीने संभाजी महाराज स्त्रीलंपट आणि व्यसनाधीन होते, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली.

Leave A Reply

Your email address will not be published.