विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा… युवा खेळाडूंवर भर…

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

पुढील महिन्यात विंडीजमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा दोन्ही संघांचे नेतृत्व करेल. कसोटी संघात प्रथमच देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये बरसणाऱ्या युवा यशस्वी जैस्वालला स्थान मिळाले आहे, तर पुजाराला संघातून वगळण्यात आले आहे.

पुजाराला या दौऱ्यापासून दूर ठेवून निवडकर्त्यांनी भविष्यातील धोरण जाहीर केले आहे, मात्र अलीकडेच डब्ल्यूटीसी फायनलमध्ये सर्वोत्तम फलंदाज ठरलेल्या अजिंक्य रहाणेला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. त्याच वेळी, दुखापतीतून सावरण्याच्या प्रक्रियेत असलेला केएल राहुल देखील दोन्ही संघांचा भाग नाही. याशिवाय वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला दोन्ही संघात, तर उमरान मलिकला वनडे संघात स्थान देण्यात आले आहे.

 

कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पाटर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.

 

एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल. युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि मुकेश कुमार

Leave A Reply

Your email address will not be published.