जळगाव आरटीओ कार्यालयाचे प्रादेशिक कार्यालयात रूपांतर

0

जळगाव :– जळगावसह राज्यातील ९ ठिकाणी डेप्युटी आरटीओ कार्यालयांचा दर्जा वाढला असून त्याचे आरटीओ अर्थात प्रादेशिक परिवहन कार्यालयात रुपांतर करण्यात आले आहे. धुळे आरटीओच्या नियंत्रणात असलेले पुरनाड व चोरवड चेकपोस्ट आता जळगावच्या कार्यालयात समाविष्ट करण्यात आले आहे. त्याशिवाय ड्रायव्हिंग स्कूलची मान्यता घेण्यासाठी धुळे येथे जाण्याची गरज नसून आता हि सेवा जळगाव प्रादेशिक कार्यालयात उपलब्ध होणार आहे.

राज्यातील ९ डेप्युटी आरटीओ कार्यालयांचे आरटीओ अर्थात प्रादेशिक परिवहन कार्यालय मंजुरीचा आदेश शासनाने २३ जून रोजी जारी केला. त्यात जळगाव, पिंपरी-चिचवड, सोलापुर, अहमदनगर, चंद्रपूर, अकोला, बोरीवली (मुंबई) व सातारा येथील उपप्रादेशिक कार्यालयांचा समावेश आहे. येथे शुक्रवारपासून आरटीओ कार्यालय संबोधले जाणार आहे. या सर्व कार्यालयांमध्ये शासनाने ४ हजार ११६ नियमित तर २०४ पदे बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करण्यास आकृतीबंध मंजूर केला आहे. २३ जून रोजी पदांचा सुधारित आकृतीबंधही मंजूर झालेला आहे.

नव्या निर्णयानुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी १, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी १, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी ४, मोटार वाहन निरीक्षक २४, लेखाधिकारी १, प्रशासकीय अधिकारी १, सहायक मोटार वाहन निरीक्षक ३०, लघुलेखक (निम्नश्रेणी) १, कार्यालय अधीक्षक ३, वरिष्ठ लिपिक १०, लिपिक टंकलेखक २०, वाहन चालक ४ असे एकूण १०० पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर झालेलाा आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी १, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी १, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी ४, मोटार वाहन निरीक्षक २४, लेखाधिकारी १, प्रशासकीय अधिकारी १, सहायक मोटार वाहन निरीक्षक ३०, लघुलेखक (निम्नश्रेणी) १, कार्यालय अधीक्षक ३, वरिष्ठ लिपिक १०, लिपिक टंकलेखक २०, वाहन चालक ४ असे एकूण १०० पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर झालेलाा आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.