भयंकर: भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत निर्घृण हत्‍या, हातोड्याने ५० वार.. (व्हिडीओ)

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या विदेशामध्ये भारतीय नागरिक असुरक्षित असल्याच्या अनेक घटना आपल्या कानावर पडल्या असतील. त्यातच अमेरिकेतून मन सुन्न करणारी घटना आली आहे. अमेरिकेतील जॉर्जियामध्‍ये २५ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची एका माथेफिरुने निर्घृण हत्‍या केल्‍याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. विवेक सैनी असे हत्‍या झालेल्‍या विद्यार्थ्याचे नाव आहे.  एक बेघर माणसाने त्‍याच्‍यावर हातोड्याने हल्‍ला करून हत्या केल्याची घटना ही  सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

https://x.com/DineshprasadB/status/1751836885243289612?s=20

हातोड्याने हल्ला

विवेक सैनी हा २५ वर्षीय तरुण जॉर्जियामध्‍ये एका फूड मार्टमध्ये लिपिक म्‍हणून काम करत होता. फूड मार्डमध्‍ये ज्युलियन फॉकनर या बेघराला विवेकसह अन्‍य कर्मचार्‍यांनी दोन दिवस आश्रय दिला होता. त्‍याला खाद्‍यपदार्थांसह एक जॅकेटही त्‍यांनी दिले होते. १६ जानेवारीला विवेक याने फॉकनरला फूड मार्टमधून जाण्‍यास सांगितले. तसेच त्‍याने पोलिसांना बोलविण्‍याचाही इशारा दिला. यानंतर विवेक घरी जात असताना फॉकनरने त्‍याच्‍यावर हातोड्याने हल्ला केला. त्‍याने विवेकच्या डोक्यावर सुमारे ५० वार केले. पोलिसांनी तत्‍काळ घटनास्‍थळी धाव घेत फॉकनरला ताब्‍यात घेतले.

हुशार विद्यार्थी

विवेक सैनी हा हरियाणातील बरवाला येथील असून चंदीगड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक पूर्ण केले होते. यानंतर अलाबामा विद्यापीठातून व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते. विवेकची चुलत बहीण सिमरन हिने दिलेल्या माहितीनुसार, विवेक हा हुशार विद्यार्थी होता. तो जॉर्जियातील एका फूड मार्टमध्‍ये नोकरी करत होता. गेल्या अनेक दिवसांपासून ज्युलियन फॉकनर हा फूड मार्टमध्‍ये होते. विवेक त्याला सिगारेट द्यायचा, पण त्यादिवशी त्याने नकार दिला. तसेच पोलिसांच्‍या ताब्‍यात देण्‍याचाही इशारा दिला. ज्युलियन फॉकनर हा अंमली पदार्थांच्‍या आहारी गेला होता तसेच तो मनोरुग्‍णही आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.