धक्कादायक; झारखंडचे CM बेपत्ता, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सक्तवसुली संचालनायकडून झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा शोध वेढला जात आहे. जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या पथकाने दिल्लीसहित यांच्या ३ ठिकाणी छापेमारी केली आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती. पण ईडीच्या पथकाला हेमंत सोरेन सापडले नाहीत. हेमंत सोरेन मागील २४ तासांपासून, बेपत्ता असल्याचा दावा ईडीने केला आहे. तर दुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चाने मुख्यमंत्री सुरक्षित असून, आपल्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे.

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे हेमंत सोरेन नेमके कुठे आहेत. याबद्दल काहीच उपलब्ध नाही. दरम्यान हेमंत सोरेन यांनी ज्या चार्टर्ड विमानाने रांची ते दिल्ली प्रवास केला ते दिल्ली विमानतळावर पार्क केल्याचं आढळलं आहे. तसंच हेमंत सोरेन यांच्यसह असणाऱ्या अनेकांचे फोन बंद आहेत. याशिवाय दिल्ल्लीत वापरण्यात आली ती ती बीएमडब्ल्यू कारही जप्त केली आहे. ईडीने त्यांच्या चालकाचीही चौकशी केली आहे. सोमवारी ईडीचे अधिकारी त्यांच्या दिल्ली आणि झारखंडमधील घरी पोहोचले होते. पण काही पत्ता लागला नव्हता.

ईडीने सर्व विमानतळावर अलर्ट पाठवला. तर दुसरीकडे ईडीला मुख्यमंत्री कार्यालयाकडून एक पत्र मिळालं आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्या १ वाजता चौकशीसाठी हजर राहतील असं सांगण्यात आल आहे.

निवासस्थानी ईडीकडून चौकशी याआधी २० जानेवारीतील ईडी जमीन घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या चौकशीसाठी रांचीत दाखल झाली होती. महिन्याच्या सुरुवातीला ईडीने केंद्रीय यंत्रणेला पत्र लिहून ते जमीन घोटाळा प्रकरणी निवासस्थानी येऊन जबाब नोंदवू शकतात असं कळवलं होतं. 20 जानेवारीला ईडीने हेमंत सोरेन यांना आठवं समन्स जारी करत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.