थंडीचा फटका.. रेल्वे वाहतूक ठप्प, 498 रेल्वे गाड्या रद्द

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून भारतातील अनेक भागांमध्ये तीव्र थंडीची लाट आल्याने भारतीय रेल्वेने आज दि. 28 जानेवारी रोजी 498 गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर काही विशेष गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

थंडीची लाट वाढल्याने भारतीय रेल्वेकडून गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी रद्द झालेल्या गाड्यांव्यतिरिक्त, 26 गाड्यांची सुरुवातीची स्थानके बदलण्यात आली, तर खराब हवामानामुळे इतर 32 गाड्यांना शॉर्ट टर्मिनेट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रद्द झालेल्या गाड्यांमध्ये उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, आसाम, हिमाचल प्रदेश, नवी दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, गुजरात, बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेश दरम्यान धावणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे.

प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत पोर्टलला भेट देऊन तपशीलाची नोंद घ्यावी. यापूर्वी 27 जानेवारी रोजी किमान 529 आणि 26 जानेवारी रोजी 1267 गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.

भारतीय हवामान खात्याने गुरुवारी सांगितले की, येत्या तीन दिवसांत उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य आणि लगतच्या पूर्व भारतावर थंडीची लाट कायम राहील. तसेच अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. यापूर्वी 27 जानेवारी रोजी तब्बल 529 आणि 26 जानेवारी रोजी 1267 गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. उत्तर रेल्वेच्या म्हणण्यानुसार, धुक्यामुळे दृश्यमानताही लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. यापूर्वी 15 जानेवारीलाही रेल्वेने गाड्या रद्द केल्या होत्या.

रद्द केलेल्या रेल्वेची यादी

08132 BADAMPAHAR (BMPR)-TATANAGAR JN (TATA)

08740 BILASPUR JN (BSP)-SHAHDOL (SDL)

09448 PATNA JN (PNBE)-AHMEDABAD JN (ADI)

12053 HARIDWAR JN (HW)-AMRITSAR JN (ASR)

12054 AMRITSAR JN (ASR)-HARIDWAR JN (HW) JSH

12179 LUCKNOWJN (LJN)-AGRA FORT (AF) SUF

12180 AGRA FORT (AF)-LUCKNOWJN (LJN) SUF

12267 MUMBAI CENTRAL (MMCT)-HAPA (HAPA) DRNT

12268 HAPA (HAPA)-MUMBAI CENTRAL (MMCT) DRNT

12327 HOWRAH JN (HWH)-DEHRADUN (DDN) SUF

12365 PATNA JN (PNBE)-RANCHI (RNC) JSH

12366 RANCHI (RNC)-PATNA JN (PNBE) JSH

12368 ANAND VIHAR TERMINAL (ANVT)-BHAGALPUR (BGP) SUF

12529 PATLIPUTRA (PPTA)-LUCKNOWJN (LJN) SUF

12530 LUCKNOWJN (LJN)-PATLIPUTRA (PPTA) SUF

12987 SEALDAH (SDAH)-AJMER (AII) SUF

14211 AGRA CANTT (AGC)-NEW DELHI (NDLS) MEX

14235 VARANASI JN (BSB)-BAREILLY (BE) MEX

52596 DJ-GHUM-DJ जॉय राईड

47105 HYB-LPI

37811 HWH- BWN M/LOCAL

37216 BDC-HWH लोकल

18104 ASR-टाटा जालीनवालाबाग एक्स्प्रेस

132333332332 ASR-टाटा जालीनवालाबाग EXP

1323333323333100 ASR-टाटा जालिनवालाबाग EXP

 

Leave A Reply

Your email address will not be published.