जिल्ह्यात नव्याने तब्बल 374 कोरोना बाधित; 468 जणांची कोरोनावर मात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जळगाव जिल्ह्यात मागील चोवीस तासात तब्बल 374 बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर 468 जणांनी कोरोनावर मात केलीय. होम आयसोलेशन केलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 3379 इतकी आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी दर 98.18% इतका आहे. तर आज एक कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालाय.

असे आढळले बाधित

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण 374 कोरोना रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात 41, जळगाव ग्रामीण 16 , भुसावळ 45, अमळनेर 43 , चोपडा 79 , पाचोरा 15, यावल 31, एरंडोल 1, जामनेर 8, रावेर 10 , पारोळा 6, चाळीसगाव 58, मुक्ताईनगर 1 आणि इतर जिल्ह्यातील 5 .

Leave A Reply

Your email address will not be published.