टीम इंडियाच्या खेळाडूवर बलात्काराचा आरोप, खेळाडू फरार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

क्रीडा विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियाच्या खेळाडूवर पॉक्सो अंतर्गत एफआरआय दाखल करण्यात आला आहे. या बातमीने क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. लग्नाचं आमिष दाखवत या खेळाडूने अनेकवेळा मुलीवर बलात्कार केल्याचं एफआयआरमध्ये म्हंटले आहे. ह्या खेळाडूवर आरोप झालेत अद्याप त्याची यावर कोणतीही प्रक्रिया आलेली नाही. कोण आहे हा खेळाडू जाणून घ्या.

नेमकं काय आहे प्रकरण ?

भारतीय हॉकी संघाचा वरून कुमार असं या खेळाडूच नाव आहे. बंगळुरूमध्ये त्याच्यावर एफआयआर दाखल झाला आहे. २०२१९ पासून दोघे एकमेकांना ओळखत होते. पीडित अल्पवयीन असून तिने ज्ञानभारती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वरून कुमार आणि पीडिता १७ वर्षांची असताना इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यावेळी वरून हा SAI येथे येथे ट्रेनिंग घेत होता. वरून कुमार याने पीडितेला लग्नाचं आमिष दाखवत अनेकवेळा बलात्कार केल्याचे आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.

कोण आहे ते खेळाडू ?
वरून कुमार हा खेळाडू हिमाचल प्रदेशातील असून, हॉकी खेळण्यासाठी तो पंजाबमध्ये गेला होता. २०१७ मध्ये वरून कुमारने टीम इंडियाकडून डेब्यू केला होता. त्यांनतर २०२२ मध्ये मर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेममध्ये रौप्य पदक जिंकलं होतं. तर २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक विजेत्या संघाचा तो भाग होता. आता या गंभीर आरोपानंतर ज्ञानभारती पोलीस जालंधरमध्ये आरोपी वरुणचा शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.