फटका कारखान्याला भीषण आग, ६ जण गंभीर, ४० गंभीर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मध्यप्रदेशमधील हरदा इथे फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. त्यानंतर कारखान्याला आग लागली आहे. यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास ४० जण गंभीर जखमी झालेत. जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कारखान्यात आणखी काही लोकं अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही आग इतकी भीषण होती की आकाशात दूरदूरपर्यंत आगीचे लोळ दिसत होते. स्फोटानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हरदातल्या मगरधा रोडवरच्या एका बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोटानंतर भीषण आग लागली. आगीने भयंकर रूप धारण केले. आसपासच्या अनेक घरांवरही याचा परिणाम झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी तत्काळ उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आले आहे. फटाका कारखान्याला लागलेल्या आगी मागे घातपात आहे की, अपघात याचा पोलीस शोध घेत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आसपासच्या परिसरातील अग्निशमन दलाच्या गाड्या बोलविण्यात आल्या आहे.

अपघात की घातपात?
मध्यप्रदेश मधील हरदा जिल्ह्यातील बैरागड परिसरातील मगरधा रोड जवळच्या एका निवासी वस्तीत बेकायदेशीर फटाका कारखाना चालविला जात होता. त्यामुळे स्फोटानंतर प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. भर वस्तीत इतका मोठा बेकायदेशीर फटाका कारखाना सुरू असतानाही प्रशासनाची नजर त्यावर कशी पडली नाही. असा प्रश्न पडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.