स्वातंत्र्याची पहाट

0

लोकशाही विशेष लेख

मित्रांनो आज 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्रता दिवस (Independence Day). तब्बल 200 वर्षापर्यंत इंग्रजांची गुलामी केल्यानंतर भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. पण तुम्हाला माहित आहे का ? 15 ऑगस्ट या तारखेला भारत सोडून अजून चार देशांना स्वातंत्र्य मिळाले होते. ते देश म्हणजेच दक्षिण कोरियाने जापान पासून बहरीनने ब्रिटेन पासून कांगोने फ्रान्स पासून व लिंकटेस्टीनने जर्मनी पासून स्वातंत्र्य मिळविले. खरंतर भारताला स्वातंत्र्य 1948 ला मिळणार होते पण महात्मा गांधींच्या भारत छोडो आंदोलनामुळे इंग्रज घाबरले व थरथरले आणि त्यांनी भरताला एक वर्ष आधीच स्वातंत्र्य दिले. ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे.

भारताला स्वातंत्र्य करण्याची सुरुवात 1930 पासूनच सुरू झाली होती. जसजसे आंदोलन व्हायचे तसतसा इंग्रजांवर दबाव पडत गेला. या आंदोलनांमध्ये खूप स्वातंत्र्यवीर व योद्ध्यानी बलिदान दिले. वेळ जात गेली काळ जवळ येत गेला. इंग्रजांनी जाहीर केले की 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र्य करण्यात येईल व भारत स्वातंत्र्य झाला ही. पण तुम्हाला आठवते का 14 ऑगस्ट च्या रात्री काय झाले होते ? सर्व देश प्रेमी भारताला स्वातंत्र्य होण्याची वाट पाहत होते. पण इतक्यात दिल्लीत संध्याकाळी 6 वाजायच्या सुमारास विजांचा कडकडात व ढगांचा गडगडात ऐकू आला व मुसळधार पाऊस सुरू झाला. तरीही पाच लाख पेक्षा जास्त लोक दिल्लीच्या रायसीना टेकडीवर उभे होते. कारण ओढ होती ती स्वातंत्र्याची. मग रात्री 9 ते 10 वाजायच्या सुमारास सरदार वल्लभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, लॉर्ड माऊंटबॅटन व डॉक्टर राजेंद्र प्रसाद व्हाइसरॉय हाऊसला पोहोचले. बारा वाजण्यासाठी थोडी वेळ बाकी होती तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंची सभा भरली व त्यांनी त्यात अशी घोषणा केली की जेव्हा रात्री सर्व जग झोपल असेल तेव्हा भारत नवीन जीवनाची सुरुवात करेल. व नवीन उल्हासासहित आनंद साजरा करेल. अशी त्यांनी प्रतिज्ञा घेतली. त्यांच्या या सभेला नियतीने प्रयत्न करा या नावानेही ओळखले जाते. पण जेवढा आनंद होता तेवढे दुःख ही होते कारण जेव्हा भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंट बॅटनने भारताला स्वतंत्र करण्याची प्रक्रिया सुरू केली तेव्हा मोहम्मद अली जिना यांनी अशी मागणी केली की आम्हाला आमचा स्वतंत्र देश हवा आम्ही भारतासोबत नाही राहू शकत तेव्हा महात्मा गांधींनी अखंड भारताचे दोन भागात विभाजन केले व एक देश पाकिस्तान व एक देश भारत असे दोन देश तयार झालेत. तेव्हा भारताला एकाच रात्री 3,46,736 चौ. किमी ची जागा व 8,15,00000 लोक गमवावी लागली. जेव्हा अखंड भारताचे विभाजन झाले तेव्हा परत भारताला स्वतंत्र करण्याची प्रक्रिया सुरू झाली. तुम्हाला माहित आहे का भारताला 15 ऑगस्ट या तारखेला च स्वतंत्र का मिळाले ? कारण जसे भारतीय शुभ व अशुभ याला खूप महत्त्व देतात तसेच इंग्रजही शुभ व अशुभ याला खूप महत्त्व देत होते. व लॉर्ड माऊंटबॅटन साठी 15 तारीख ही शुभ होती. म्हणून इंग्रजांनी भारताला 15 ऑगस्ट 1947 या रोजी स्वातंत्र्य दिले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वात आधी पंडित जवाहरलाल नेहरूंनी केंद्रीय संसद वर तिरंगा फडकवला. सर्व देश प्रेमी आनंदात मग्न होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही इंग्रजांचा अपमान न करता त्यांना मानासहित परतवले. अशाप्रकारे आपल्याला स्वातंत्र्याची पहाट बघायला मिळाली. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

सौरभ खैरनार

Leave A Reply

Your email address will not be published.