इंदूरमध्ये आता ‘नो थू-थू अभियान ‘ ! ; नागरिकांना थुंकण्यासाठी मिळणार कप !

0

इंदूर , लोकशाही न्यूज नेटवर्क

सार्वजनिक ठिकाणी, सरकारी कार्यालये अथवा अन्य जागी बेधडक पान-तंबाखू-गुटखा खाऊन पिचकारी मारणाऱ्या व्यक्तींना दंड केला जातो. मात्र मध्य प्रदेशमधील इंदूर या शहरात आता पालिकेतर्फे नो थू-थू अभियान राबवण्यात येत आहे. ज्या प्रमाणे जुन्या काळात पानाची पिंक टाकण्यासाठी तसे जायचे त्याप्रमाणे आता पान-तंबाखू-गुटखा खाणाऱ्यांना पर्यावरणपूरक कप देण्यात येणार आहे. जेणेकरून पानाची किंवा गुटख्याची पिंक इतरत्र न टाकता त्या कपातच टाकता येईल. महापालिका प्रशासनातर्फे असे कप मोफत वाटण्यात येत आहेत.

इंदूरचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांनीही या अभियानात सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, शहरातील लोकांनी सार्वजनिक स्थळी थुंकण्याची सवय मोडायला हवी. त्यामुळे हा विशेष कप आम्ही त्यांना मोफत देत आहोत. जेणेकरून त्यांना थुंकण्यासाठी योग्य पर्याय मिळेल आणि अस्वच्छता आणि रोगराई होणार नाही, अशी माहिती भार्गव यांनी दिली आहे.

असे आहे हे कप

हे एक स्थानिक स्टार्टअप असून या स्टार्टअपचे सहसंस्थापक तसंच तोंडाचे सर्जन असलेल्या डॉ. अतुल काया यांनी या कपाबद्दल विशेष माहिती दिली. हा सर्वसाधारण कप नसून या कपमध्ये 30 वेळा पिंक टाकता येईल. 240 मिलीलीटर पिंक यात जमा होऊ शकेल. तसंच, या कपातील रसायनांमुळे द्रव पदार्थाचं रुपांतर स्थायुरूपातील कचऱ्यात होईल, अशी माहिती डॉ. काया यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.