डर्बनमध्ये पुन्हा चमकणार टीम इंडिया, हे आकडे आहेत विजयाची हमी !

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा उद्यापासून म्हणजेच १० डिसेंबरपासून सुरू होत आहे. प्रथम, दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची T20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादव टीम इंडियाची कमान सांभाळणार आहे. त्याचवेळी, मालिकेतील पहिला सामना डर्बनमधील किंग्समीड क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. या मैदानावर टीम इंडियाचे आकडे खूपच प्रभावी आहेत.

टीम इंडियाने आतापर्यंत डरबनच्या किंग्समीड क्रिकेट स्टेडियमवर 5 टी-20 सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे टीम इंडियाने यापैकी एकही सामना गमावलेला नाही. या 5 सामन्यांपैकी टीम इंडियाने 4 सामने जिंकले असून 1 सामना अनिर्णित राहिला आहे. 2007 मध्ये भारताने पाकिस्तानचा बॉल आउटमध्ये 3-0 ने पराभव केला होता, हा सामना देखील याच मैदानावर खेळला गेला होता.

T20 मध्ये दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड

T20 क्रिकेटमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत 24 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी टीम इंडियाने 13 वेळा विजय मिळवला असून 10 सामने दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहेत. एक सामनाही अनिर्णित राहिला आहे. त्याच वेळी, दक्षिण आफ्रिकेत दोन्ही संघांमध्ये 7 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने 5 टी-20 सामने जिंकले आहेत आणि फक्त 2 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

T20 मालिकेसाठी भारतीय संघ:

यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन,

रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.

T20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ:

एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, मॅथ्यू ब्रेट्झके, नांद्रे बर्जर, गेराल्ड कोएत्झी (पहिली आणि दुसरी टी२०), डोनोव्हॉन फरेरा, रीझा हेन्ड्रिक्स, मार्को जॅन्सन (पहिली आणि दुसरी टी२०), हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, एंडिल फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिझाद विल्यम्स, ब्यूरन हेंड्रिक्स.

Leave A Reply

Your email address will not be published.