वाळूची अवैध वाहतूक, चार ट्रॅक्टरवर धडक कारवाई

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

दिवसेंदिवस गिरणा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक सुरूच आहे. याप्रकरणी चार ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांनी मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता धडक कारवाई केली. सदर मोहिम निमखेडी शिवार, खेडी खुर्द शिवार, आव्हाणे फाटा परिसरात राबविण्यात आली. या मोहिमेत तालुका पोलीसांनी वाहने जप्त केली असून पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गिरणा नदीपात्रातून निमखेडीसह खेडी खु. मार्गे वाळूची अवैध वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता मिळाली. पोलीस पथकाला कारवाईच्या सुचना दिल्यानंतर पथकाने दुपारी २ वाजता निमखेडी शिवारातून खोटेनगर, गुजराल पेट्रोल पंपाजवळील हॉटेल क्रिष्णा व आव्हाणे फाट्याकडून जळगावकडे तर खेडी खु. शिवारातून विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरने वाळूची अवैध वाहतुक करणारे चार ट्रॅक्टर पकडले.

दरम्यान  त्याच्याकडे परवाना असल्याची चौकशी केली असता त्याच्याकडे कुठलाही वाळू वाहतुकीचा परवाना नव्हता. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक राजेंद्र लोटू सोनवणे (वय ३०, रा. खेडी खुर्द पोस्ट कढोली ता. एरंडोल), गणेश दरबाज कोळी (वय २९, रा. पाळधी बु कोळीवडा ता. धरणगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.