इकरा युनानी मेडिकल कॉलेजतर्फे युनानी घरगुती औषधांचे प्रदर्शन

0

जळगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क
इकरा युनानी मेडिकल कॉलेज यांच्यातर्फे हकीम अजमल खान यांच्या जयंती अनुषंगाने दिनांक ९/२/२०२३ रोजी मेहरून येथील एच जे थीम कॉलेजच्या मैदानात घरगुती औषधांचे भव्य प्रदर्शन ठेवण्यात आले आहे . अशी माहिती करीम सालार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यात आपल्या किचनमध्ये ज्या काही वस्तू आहेत त्यांच्यापासून घरगुती औषध कशी तयार करायची याची सर्व माहिती प्रदर्शनात सांगण्यात येणार आहे आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये व्यायामाचे अभाव उशिरा उठणे मोबाईलचे जास्त वापर कॉम्प्युटरवर तसं तास बसणे यामुळे आपल्या शरीरावर वेगवेगळे आजार उद्भवतात त्या आजारांसाठी हेलोपॅथीच्या जास्त प्रमाणावर वापर केल्यानंतर आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतात युनानी मी आपल्या किचन मधील हळद आले काळीमिरी आणि इतर काही गोष्टी यांचा वापर कसा करायचा हे प्रदर्शनामध्ये सांगण्यात येईल. प्रदर्शनाचे उद्घाटन ११ वाजता महापौर जयश्री सोनवणे यांच्या हस्ते होणार आहे. जळगाव शहरातील नगरसेवक समाजसेवक उपस्थित राहणार आहे . प्रदर्शनासाठी सर्व नागरिकांनी लाभ घ्यावाअशी माहिती अध्यक्ष इक्बाल शाह ,डॉ. करीम सालार, प्राचार्य डॉक्टर अब्दुल कसूद, उपपाचार्य शोएब शेख ,डॉ. खान नाझिमा , डॉ. अजमुद्दीन काजीआदी उपस्थित होते.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.