२०२४ मध्ये प्रदर्शित होणार “कांतारा २”…!

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

जगभर गाजलेला ‘कांतारा’ (Kantara) चित्रपटाने जगाला वेड लावला होता. ऋषभ शेट्टीच्या (Rishabh Shetty) ‘कांतारा’ या चित्रपटाने आपल्या उत्कृष्ट कथानक आणि सीन्सने दर्शकांची मने जिंकली आहेत. केवळ 16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 450 कोटींची कमाई करत बोलबाला केला. तसेच, बॉलिवूड सेलिब्रिटींपासून जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी या चित्रपटाचे कौतुकही केले. इतकेच नाही तर ‘कांतारा’ हा 2022 चा धमाकेदार ब्लॉकबस्टर (Blockbuster) चित्रपट ठरला. चित्रपटाला मिळालेल्या उदंड यशानंतर प्रेक्षक याच्या सिक्वेलच्या घोषणेची वाट पाहत असतानाच, निर्मात्यांनी आता अखेर चित्रपटाच्या प्रीक्वेलची घोषणा केली आहे.

नुकतेच कांताराने 100 दिवस पूर्ण केले आहेत. यानिमित्ताने चित्रपटाच्या टीमने सेलिब्रेशन केले. यानिमित्ताने चित्रपटाचा लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी याने चित्रपटाच्या प्रीसिक्वेलची घोषणा केली आहे. म्हणजेच ‘कांतारा 2’ हा ‘कांतारा’चा पुढचा भाग नसून मागचा भाग असणार आहे. ‘कांतारा 2’मध्ये चित्रपटाचा आधीचा भाग दाखवण्यात येणार आहे. ऋषभने केलेल्या घोषणेनुसार, दुसऱ्या भागात दैवबद्दल दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘कांतारा’च्या प्रीक्वेलबद्दल बोलताना ऋषभ म्हणाला, “आम्ही प्रेक्षकांचे खूप आभारी आहोत ज्यांनी ‘कांतारा’ला अपार प्रेम आणि पाठिंबा देऊन हा प्रवास पुढे नेला, सर्वशक्तिमान देवाच्या आशीर्वादाने या चित्रपटाने यशस्वीरित्या 100 दिवस पूर्ण केले आहेत. अशातच, या विशेष प्रसंगी मी ‘कांतारा’च्या प्रीसिक्वेलची घोषणा करत आहे. तुम्ही पाहिलेला पार्ट 2 आहे, पार्ट 1 पुढील वर्षी येईल. ‘कांतारा’ चित्रपटाचे शूटिंग करत असताना ही कल्पना माझ्या मनात आली कारण कांताराचा इतिहास अधिक खोल आहे. तसेच, या चित्रपटाच्या लिखाणावरही आम्ही काम करत आहोत. संशोधन अद्याप सुरू असल्याने चित्रपटाबद्दल तपशील उघड करणे फार लवकर होईल.”

 

Leave A Reply

Your email address will not be published.