हनी ट्रॅप लावून जळगावच्या व्यवसायिकाकडून साडेसात लाख उकळले !

0

जळगाव ;– शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये राहणाऱ्या एका ५१ वर्षीय व्यावसायिकाची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. फेसबुकवर व्हिडिओद्वारे त्याला हनी ट्रॅप मध्ये अडकवून त्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून तब्बल ७ लाख ७७ हजार रुपये उकळल्याची घटना सायबर पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे.

शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये मिनरल वॉटरचा व्यवसाय करणाऱ्या ५१ वर्षीय व्यावसायिकाने सायबर पोलीस स्टेशनला बुधवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तक्रार दाखल केली आहे. या व्यवसायिकाला १६ ते १९ जूनच्या दरम्यान त्यांच्या फेसबुक खात्यावर रिया अग्रवाल नामक खातेधारकाने फिर्यादी यांच्याशी मेसेंजर वर चॅटिंग व व्हिडिओ कॉल करून ओळख निर्माण केली. त्यानंतर फिर्यादीशी गोड गोड बोलून त्याचा नग्न व्हिडिओ तयार केला.

त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली. संशयित आरोपीच्या बँक व मोबाईल मधील गुगल पे खात्यामध्ये फिर्यादी यांनी वेळोवेळी ७ लाख ७७ हजार ७४५ रुपये पाठविले. दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी व्यवसायिकांनी सायबर पोलीस स्टेशनला धाव घेतली. त्या वरून अज्ञात रिया अग्रवाल नामक अकाउंट धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर करीत आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.