जळगाव: हाऊस ऑफ ज्वेल्समध्ये चोरी; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगावमधील रिंगरोड परिसरात असलेल्या हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज या भव्य शो रुममध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या भव्य शो रुममधून सोने व डायमंडचा समावेश असलेले मंगळसुत्र, सोने व डायमंडचा समावेश असलेल्या लेडीज अंगठ्या यांचा समावेश आहे. एकुण 1 लाख 2 हजार 659 रुपयांचा मुद्देमाल 21 ते 23 ऑक्टोबर 2022 दरम्यान चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अभिषेक सुनिल बाफना यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास स.पो.नि. किशोर पवार करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.