हिंगोली येथे छगन भुजबळ यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठवाड्यातील हिंगोली येथे ओबीसींचा दुसरा मेळावा होत आहे. त्या मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ हे नांदेडमध्ये विमानाने दाखल झाले. तिथून ते कारने हिंगोलीकडे रावण झाले आहेत. अर्धापूरजवळील पिंपळगाव पाटीजवळ भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आणि झेंडे दाखवले. पोलिसांनी तीन कार्यकर्त्यांना अटक केल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी वाट मोकळी करुन दिल्याने भुजबळ हिंगोलीकडे रवाना झाले.

दुसरीकडे रविवारी सकाळीच स्वराज्य संघटनेने भुजबळांची सभा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे हिंगोली येथे सभास्थळी आणि नांदेड विमानतळावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. जालन्याच्या अंबडमध्ये पहिल्या सभेत भुजबळांनी आक्रमक भाषण केल्याने त्यांचा निषेध केला जात आहे.

मराठा आरक्षणाचा लढ एकीकडे सुरु असताना छगन भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. त्यातच मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात आरक्षणावरून तू-तू..मैं-मैं.. होत आहे. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झालेलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.