अंकिता लोखंडेचे चे प्रेग्नेंसी रिपोर्ट समोर, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या ‘बिग बॉस १७’ दमदार स्पर्धक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करतांना दिसत आहे. शोमध्ये अंकिता हिने पती विकी जैन यांच्यासोबत प्रवेश केला. शोमध्ये अनेकदा या दोघांमध्ये भरपूर प्रमाणात वाद झाल्याचे दिसून आले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अंकिता तिच्या प्रेग्नेंसीमुळे देखील तुफान चर्चेत आहे. एवढंच नाही तर, ‘बिग बॉस’च्या घरात अंकिता हिने प्रेग्नेंसी टेस्ट देखील केल्या.. आता अंकिता हिचे प्रग्नेंसी रिपोर्ट लीक झाले आहेत.

प्रेग्नेंसी रिपोर्ट लोक झाल्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली. सध्या सर्वत्र फक्त विकी आणि अंकिताच्या प्रेग्नेंसीची चर्चा रंगली आहे. प्रेग्नेंसीबद्दल खुद्द अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं होत. ‘बिग बॉस’च्या घरात सतत होत असलेली चिडचिड आणि मासिक पाली चुकल्यामुळे प्रेग्नेंसी टेस्ट केली. असं अभनेत्रीकडून सांगण्यात आले होते.

अंकिताचे रिपोर्ट समोर
आता अंकिता हिने प्रेग्नेंसी रिपोर्ट समोर आले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता हिचे प्रेग्नेंसी रिवर्त निगेटिव्ह आहेत. त्यामुळे अंकिता आणि विकी यांनी त्यांच्या पहिल्या बाळाची अपेक्षा सोडल्याची देखील समोर येत आहे. लीक झालेल्या रिपोर्टनुसार अभिनेत्री सध्या प्रेग्नेंट नसल्याची माहिती मिळत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.