१० हजार वर्षांपूर्वी नामशेष झालेला वूली मॅमथ येत्या पाच वर्षात जन्माला येणार ?संशोधकांचा दावा

0

नवी दिल्ली ;- 10 हजार वर्षांपूर्वी पृथ्वीतलावरून गायब झालेला प्राणी वूली मॅमथ येत्या पाच वर्षात पुन्हा जन्माला येईल असा दावा संशोधकांनी केला आहे.

पृथ्वी तलावर लाखो कोट्यावधी जीव अस्तित्वात असून काही नामशेष झाले आहेत. तर, काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. नामशेष होच असलेल्या प्रजाती वाचवण्यासाठी संशोधकांचे प्रयत्न सुरु आहेत आहेत.

तर, नामशेष झालेल्या प्रजातींचा शोध घेतला आहे. या संशोधनात संशोधकांना मोठे यश आले आहे. 10 हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवरुन गायब झालेला प्राणी, येत्या 5 वर्षात पुन्हा जन्माला येणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

वूली मॅमथ असे 10 हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवरुन गायब झालेल्या प्राण्याचे नाव आहे. हे प्राणी हत्तीचे वंशज मानले जातात. कारण या प्राण्याची रचना हत्ती सारखी आहे. या प्राण्यांना हत्तीसारखी सोंड आणि हत्तीसारखे सुळे आहेत. अवाढव्य आकाराचा हा प्राण्याची तुलना डायनॉसर सोबत केली जाते. हा पृथ्वीवर सर्वात मोठ्या आकाराचा प्राणी होता. या प्राण्याच्या शरीरावर असलेले केस हे लोकरीप्रमाणे आहेत. यामुळेच यांना वूली असे म्हंटले जाते.

कसा येईल जन्माला ?

आर्क्टिक पर्माफ्रॉस्टमध्ये वूली मॅमथ या प्राण्याचे अवशेष सापडले आहेत. वूली मॅमथच्या अनुवांशिक सामग्रीला आशियाई हत्तींच्या डीएनएसह एकत्रित करून या प्राण्याचे जनुक संच पुन्हा तयार केले जाणार आहेत. आशियाई हत्तींची रचना मॅमथच्या सर्वात जवळची मानली जाते. त्यामुळे यासाठी आशियाई हत्तींची निवड करण्यात आली आहे.

आशियाई हत्तींच्या DNA सोबत वूली मॅमथच्या अवशेषांची जीन्स एकत्र करून शास्त्रज्ञ एक नवीन प्राण्याचे जनुक तयार करणार आहेत. जीनोमची पुनर्रचना झाल्यानंतर ते सरोगेट हत्तींमध्ये मॅमथ भ्रूण रोपण करण्याचा संशोधकांचा प्रयत्न आहे. या प्रयोगातून नवीन प्राणी जन्माला येईल त्यात वूली मॅमथची सर्व जैविक वैशिष्ट्ये असतील असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. बायोटेक कंपनी कोलोसल बायोसायन्सच्या शास्त्रज्ञ या प्रयोगावर काम करत आहेत. या प्रयोगाद्वारे वूली मॅमथचे पहिले बाळ हे पाच वर्षांनंतर म्हणजेच 2028 पर्यंत जन्माला येईल. कंपनीने आपल्या वेबसाइटवर या प्रयोगाबाबत माहिती दिली आहे.

10 हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवरुन गायब झालेला जीव पुन्हा अस्तित्वात आणण्याचा कंपनीचा दावा आहे. शास्त्रज्ञांनी वूली मॅमथ या प्राण्याच्या डीएनएवर संशोधन केले. जनुकं आशियाई हत्तींशी मिसळली गेली, तर वूली मॅमथसारखे प्राणी पुन्हा पृथ्वीवर आणले जाऊ शकतात. कोलोसल बायोसायन्स कंपनीच्या प्रयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.